दौंड : केडगाव हि दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. एकट्या केडगावची लोकसंख्या 25 हजारांच्या पुढे गेली असून मतदार संख्या जवळपास 15 हजारांच्या घरात आहे. असे सर्व असतानाही जिल्हा परिषद गट रचनेमध्ये केडगावचे दोन तुकडे करण्यात आले होते त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पहायला मिळत होती आणि नेमका हाच धागा पकडून ‘सहकारनामा’ ने त्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची व्यथा मांडली होती. आज ‘सहकारनामा’ च्या बातमीचा मोठा इफेक्ट झाल्याचे पहायला मिळत असून केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार केडगाव हे आता एकाच गटाला जोडण्यात आले असून त्याचे दोन तुकडे होण्यापासून वाचले आहेत.
हिच ती बातमी >>> केडगावच्या दोन तुकड्यांवरून मोठे रन कंदन, कार्यकर्ते बंडाच्या तयारीत
केडगावचे दोन तुकडे करण्यात आल्यानंतर एक भाग हा पारगाव – पिंपळगाव गटाला जोडण्यात आला होता तर दुसरा भाग हा बोरिपार्धी – वरवंड गटाला जोडण्यात आला होता. या सर्व प्रकारामुळे केडगावकरांची मोठी कुचंबना झाली होती आणि त्याचे वास्तव हे सहकारनामा ने आपल्या बातमीतून प्रसिद्ध केले होते.
या सर्व घडामोडीनंतर केडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत रीतसर हरकत नोंदवली होती आणि केडगाव हे एकाच गटात रहावे अशी मागणी केली होती.
खरेतर केडगाव हे इतके मोठे गाव आहे की केडगाव हाच गट ठेवण्यात येतो आणि त्याला विविध गावे जोडून त्याचा जिल्हा परिषद गट आणि दोन गन होतात. यावेळी मात्र केडगावला अन्य गटात समाधान मानावे लागणार असले तरी केडगावचे मतदान हेच निर्णायक ठरणार यात शंका नाही.