Categories: आरोग्य

खा.सुप्रिया सुळेंची ‛ती’ पोस्ट व्हायरल होताच अनेकांचे धाबे दणाणले, वाचा काय आहे नेमकी ‛ती’ पोस्ट

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून असून यामुळे अनेकांना सुप्रिया सुळेंची चिंता लागली असून तर काहींचे धाबेही दणाणले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ‛मी आणि सदानंद’, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या… अशी पोस्ट त्यांनी केली असून त्यामुळे त्यांच्या प्रकृती संदर्भात अनेकांना चिंता लागली आहेत तर संपर्कात आलेल्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे ह्या आपल्या मतदार संघातील आणि राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात सतत जागरूक असतात आणि त्यामुळे त्या थेट स्थळ पाहणी करण्यासाठी कायम दौऱ्यांवर असतात. त्यामुळे त्यांना नेमकी कुठे आणि कशी कोरोनाची बाधा झाली हे लगेच समजणे अवघड आहे. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोविड टेस्ट करून घेण्याची विनंती खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच आपण आणि सदानंद सुळे हे ठणठणीत असून काळजी करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago