Categories: क्राईम

Big News | दहीहंडीतील वाद विकोपाला ! गोपाळवाडीतील दोन गटात तुफान हाणामारी, 12 बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

अख्तर काझी

दौंड : गोपाळवाडी मधील दहीहंडी उत्सवामध्ये दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. हे वाद गावातील वडीलधारी मंडळींनी मध्यस्थी करून मिटविले होते. मात्र या दोन गटात पुन्हा वादाची ठिणगी पडून याचे पर्यावसन एक दुसऱ्याची माणसे रस्त्यामध्ये गाठून तुफान हाणामारीत झाले. या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रोहन पवार व प्रतीक होले यांनी दौंड पोलिसांकडे परस्परविरोधी तक्रार केली असून सुरज राजू होले, प्रतीक महादेव होले, ओंकार नाना होले, प्रवीण मधुकर पवार, सौरभ नाना पवार, रोहन राजू पवार, रोहित राजू पवार, अशोक दादा पवार, नवनाथ दादा पवार, हरीश ज्ञानदेव पवार, इंद्रजीत नामदेव पवार (सर्व रा. गोपाळवाडी, दौंड) व एक अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्या 12 जणांची नावे आहेत.

दौंड पोलिसांच्या माहितीनुसार, दि.10 सप्टेंबर रोजी सायं. 6.30 वा दरम्यान फिर्यादी रोहन पवार हे दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना, गोपाळवाडी रोड येथील गायत्री अपार्टमेंट येथे सुरज होले याने आपल्याकडील लोखंडी सळई ने व प्रतीक होले याने हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना मारहाण केली. हाणामारीची घटना पाहून फिर्यादी यांचे मित्र हरीओम येडके यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ओंकार होले व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तलवारीने मारहाण केली. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्याने मारहाण करणारे पळून गेले असे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे.

तर दुसऱ्या फिर्यादीनुसार, दि. 9 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वा. दरम्यान फिर्यादी प्रतीक महादेव होले हे रानातील काम आटपुन घरी जात असताना गोपाळवाडी रोड येथील गायत्री अपार्टमेंट येथे त्यांना प्रवीण पवार, सौरभ पवार, रोहन पवार ,रोहित पवार, अशोक पवार, नवनाथ पवार, हरीश पवार, इंद्रजीत पवार या सर्वांनी थांबविले व तुझा चुलत भाऊ कोठे आहे, त्याने आमच्या सोबत दहीहंडी कार्यक्रमात भांडण केले आहे, आम्ही त्याला सोडणार नाही अशी दमदाटी केली. मला यातील काही माहीत नाही असे फिर्यादी यांनी सांगितले असता, त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणी दरम्यान फिर्यादी यांची चार हजार रुपयांची रक्कम कोठेतरी पडली आहे असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

11 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago