Big News | राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालायकडून त्यांना पुन्हा ही सदस्यता बहाल करण्यात आली आहे. याबाबत लोकसभा सचिवालायकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून गुजरात च्या सुरत कोर्टने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. हीच शिक्षा गुजरात हायकोर्टनेही कायम ठेवल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.

हेही वाचा – https://sahkarnama.in/prime-minister-narendra-modi-performed-bhumi-pujan-through-video-conferencing-at-daund-railway-station-mla-rahul-kool-thanked-modi/

मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेत खालच्या न्यायालयांच्या शिक्षेवर स्थगिती दिली होती. आणि सर्वोच्च शिक्षा सूनवल्याबद्दल न्यायालयांवर ताशेरेही ओढले होते. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आल्यानंतर विविध राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.