दौंड : सहकारनामा ऑनलाइन
पारगाव ता.दौंड येथील भर चौकात असणारे बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी उखडून घेऊन गेल्याची घटना घडली आहे. याबाबत बँकेचे व्यवस्थापक महेश आदिनाथ भारती यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.१७ नोव्हेंबर रात्री ११:३० ते दि.१८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या दरम्यान पारगाव ता.दौंड येथील ओम श्री गणेशा कॉम्प्लेक्स मध्ये राजेंद्र दत्तात्रय ताकवणे यांच्या नावावर असणाऱ्या गाळयामधील ए.टी.एम.मशीन व त्यामध्ये असणारी ६ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम असे एकुण ६६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी उघडे दरवाजातुन प्रवेश करून चोरून नेला आहे.
हि घटना उघडकीस आल्यानंतर यवत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली आहे. याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली असून यवत पोलीस अधिक तपास करीत आहेत.