Categories: Previos News

Big News : दौंड मध्ये युवकाची डोक्यात गोळी मारून आत्महत्या

दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

नवीन वर्षाच्या दुसऱ्याच सकाळी युवकाने डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड शहरात घडली आहे. दादासाहेब लक्ष्मणराव नलगे (वय 36,रा. तारामती अपार्टमेंट, दौंड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सकाळी  9  वा.  सुमारास  दादा  नलगे  यांनी आपल्याकडे असणाऱ्या पिस्तुलातून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. 

दौंड पोलीस स्टेशन  शेजारील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया शेजारील इमारतीमध्ये नलगे यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. 

नलगे यांच्या आत्महत्येची नोंद दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नलगे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी साठी पुणे येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दादा नलगे यांच्या  आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

शहरातील नगर मोरी चौकामध्ये दादा नलगे यांच्या मालकीचा शांताई बिअर बार आहे, घरचा मोठा शेती व्यवसाय तसेच राजकीय क्षेत्रातही मोठी ओळख असलेल्या दादा नलगे यांनी आत्महत्या का केली असावी याबाबत शहरात चर्चा असून या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago