Big News – वेळेत राष्ट्रध्वज न उतरविल्याने शाळेच्या मुख्यध्यापकावर गुन्हा दाखल, दौंड तालुक्यातील प्रकार



दौंड : सहकारनामा

प्रजासत्ताकदिनी वेळेवर राष्ट्रध्वज खाली न उतरविल्याने शाळेलच्या एका मुख्यध्यापकावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विजय खाश्याबा पवार (वय 56 वर्शे व्यवसाय नोकरी रा.मातृपितृ छाया बिल्डींग जे.जे.नगर केसनंद फाटा वाघोली ता.हवेली जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी संभाजी विठठल फराटे (रा.मांडवगण फराटा ता.शिरूर जि.पुणे) या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल केला आहे.

हि घटना 26/01/2021 रोजी  सायं. 06.45 वा. चे सुमारास मौजे  जिल्हा परिषद षाळा वाळकी ता दौंड जि पुणे येथे घडली होती. वर नमुद केले तारखेस वेऴी व ठिकाणी 26 जानेवारी 2021 रोजीच्या प्रजासत्ताक दिनी सकाळी 08.00 वा.सुमारास ध्वजारोहन करण्यात आले होते. त्यानंतर शाळेमध्ये धजारोहण केलेला ध्वज हा सुर्यास्तापुर्वी उतरविणे आवश्यक होते परंतु तो शाळेचे मुख्याध्यापक यांनी ध्वज सायंकाळी 6.45 वा.सुमारास उतरविल्याचे समक्ष कळविले होते.

त्यानंतर त्यांचे तसे सविस्तर जबाब घेवुन ते पंचायत समिती दौड येथील गट शिक्षण अधिकारी यांना लेखी रिपोर्ट त्याच दिवशी देण्यात आला होता. त्यानंतर गट विकास अधिकारी पंचायत समिती दौड यांनी लेखी प्रत्राद्वारे जिल्हा परिषद शाळा वाळकी येथील मुख्याध्यापक संभाजी विठठल फराटे (रा.मांडवगण फराटा ता.शिरूर जि.पुणे) यांनी ध्वज सुर्यास्तापुर्वी वेळेत सन्मान पर्वक उतरिवणे हे माहीत असतानाही त्यांनी राष्ट्रीय ध्वज वेळेत उतरविला नाही म्हणुन त्यांनी भारतीय ध्वज संहितेचा भंग केला म्हणुन फिर्यादी यांनी त्यांच्या विरुद्ध राष्ट्रीय   सन्मान अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली होती.

त्यानुसार संभाजी फराटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार- पो ना  पोटे हे असून अधिक तपास सपोनि कापरे हे करीत आहेत.