| सहकारनामा |
दौंड : आज दिनांक 18/05/2021 रोजी यवत चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तसेच केडगाव दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले पोलीस नाईक रमेश काळे, रवींद्र गोसावी ,चोरमले, विशाल गजरे पोलीस अंमलदार तात्या करे , राहुल गडदे , विकास कापरे, भारत भोसले, दादासाहेब दराडे, बापू जगताप, आवळे हे कोरोना रोगाचे प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारी वाहनाने तसेच खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी मौजे देऊळगाव गाडा तालुका दौंड गावचे हद्दीत हॉटेल गुलमोहरचे पाठीमागे इसम खंडू आप्पा केसकर (वय 29 वर्षे राहणार देऊळगाव गाडा तालुका दौंड जिल्हा पुणे) हा आपले कब्जात बेकायदा विदेशी दारूचा एकूण किंमत रुपये 54 हजार 393 रुपयाचा प्रोव्हीबिशन गुन्ह्याचा माल जवळ बाळगून तो स्वतःच्या फायद्यासाठी चोरून बेकायदेशीरपणे विक्री करत असताना मिळून आला. सदर इसमावर यवत पोलिसांनी कारवाई करत सर्व दारुसाठा ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले हे करीत आहेत.