दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील मळद येथे सुमारे 30 लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना काल शनिवारी रात्री घडली होती. या लुटीमागे आता केडगाव-वाखारी येथील युवकांच्या टोळीचा हात असल्याचे समोर येत असून पाटस पोलिसांनी एकास जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील एक आरोपी हा यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पाटस पोलीस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब पानसरे व
पोलीस मित्र सोनबा देशमुख हे आज रविवारी यांनी पहाटे पाटस टोल नाक्याजवळ पाहणी करत असताना यातील एक आरोपीस हॉटेलवर संशयितरित्या वावरून चहा पित असताना ताब्यात घेतले. या आरोपीकडून चोरलेल्या रकमेपैकी 2 लाख १० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. नंतर या आरोपीला दौंड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या आरोपीचे नाव प्रकाश पांडुरंग गोरगल (वय ३६) असे असून तो (वाखारी
ता.दौंड ) येथे राहत असल्याचे समोर आले आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर मळद जवळ झालेल्या 30 लाखांच्या लुटमारीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सुरक्षा यंत्रणेवर संदेश पाठवला होता, तसेच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संतोष पंडित यांनीही ग्राम सुरक्षा यंत्रणेवर ऑडिओ मेसेज पाठवून सर्वांना सतर्क केले यामुळे आरोपीना पळून जाण्यात मोठी अडचण निर्माण झाली त्यामुळे या आरोपींनी एक दुचाकी पाटस टोल नाक्याजवळ फेकून लुटीतील रक्कम त्यासोबत टाकून पळ काढला होता.
मात्र पोलीस सर्वत्र शोध घेत असल्याने आरोपींना लपून बसने कठीण झाले होते. पकडलेल्या आरोपी सोबत आणखीन 4 जण असल्याचे समोर येत असून पोलिसांच्या गतिमान तपासी चक्रामुळे एक आरोपी हाती लागला आहे तर उर्वरित आरोपीही लवकरच सापडतील असा विश्वास यवत, दौंड पोलिसांनी व्यक्त केला आहे.