Big News – दौंडमध्ये खाजगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल, व्याजाचे पैसे परत दिले नाही म्हणून केली मारहाण



|सहकारनामा|

दौंड : व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून खाजगी सावकाराने एकास मारहाण केल्याची घटना दौंड मध्ये समोर आली आहे. सुनील लक्ष्मण शितोळे (रा. अमर सोसायटी, दौंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

अमित बारवकर (रा. समता नगर,दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकाराचे नाव आहे. दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांनी मित्राच्या मध्यस्थीने अमित बारवकर यांच्याकडून 50 हजार रुपये प्रति महिना 5 हजार रुपये दराने व्याजाने घेतले, ते पैसे परत केले नाही म्हणून दिनांक 22 जून रोजी अमित याने फिर्यादीस जबरदस्तीने आपल्या चार चाकी वाहनात बसवून गोपाळवाडी रोड परिसरातील समता नगर व पुष्प लक्ष्मी हॉस्पिटल परिसरात नेऊन मारहाण करीत जखमी केले. 

या प्रकरणी दौंड पोलिसांनी अमित बारवकर याच्यावर खाजगी सावकारी, अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करित आहेत.