Big News..यवत, भरतगाव, केडगावच्या हंडाळवाडी मधील पुन्हा ‛तीन’जण कोरोना ‛पॉझिटिव्ह’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील यवत, भरतगाव  आणि केडगाव मध्ये पुन्हा एक-एक असे तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. काल दौंडच्या ग्रामीण भागातील 31 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती त्यामध्ये वरील तीन गावांतील हे तिघे पॉझिटिव्ह आले आहेत. पुन्हा या गावांमधील 3 जण पॉझिटिव्ह आल्याने दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण  आहे.

काल, परवाच केडगाव, पारगाव, चौफुला, यवत, वरवंड, पाटस, पडवी, मलठण, दौंड शहर या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते त्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातील चिंता वाढल्या होत्या. आज पुन्हा वरील तिन्ही गावांमध्ये 3 रुग्ण सापडल्याने आता कोरोना आपले जाळे वाढवत असल्याचे समोर येत आहे. यवत, भरतगाव, आणि केडगावमध्ये मिळून तीनजण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी ‛सहकारनामा’ला दिली आहे.