Categories: Previos News

Big News – ‛या’ देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू, पुन्हा लॉकडाउन होणार!



आंतरराष्ट्रीय – 

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता पुन्हा एकदा आपले उग्ररुप दाखविण्यास सुरुवात केली आहे. आणि याची सुरुवात ब्रिटनसारख्या प्रगत राष्ट्रामधून होत असल्याचे समोर येत आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची पुन्हा दुसरी लाट सुरू झाली असल्याने ब्रिटनची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनमध्ये लवकरच  निर्बंध लागू होणार असल्याचे तेथील  पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जाहीर केले आहे.

कोरोनाच्या विळख्यात सध्या संपूर्ण जग सापडले आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउन सुरू असून भारतासह काही देशांनी अनलॉकडाउन कडे वाटचाल सुरू केली आहे, मात्र ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने अन्य देशांच्या चिंता वाढल्या आहेत. 

सध्या ब्रिटनचा बधितांचा आकडा हा 3 लाख 98 हजरांच्या पुढे असून तेथे कोरोनामुळे आत्तापर्यंत 41 हजारांच्या पुढे नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रिटन कोरोनातून मुक्त होत असतानाच पुन्हा दुसरी लाट आल्याने तेथे एक आठवड्यात हजारोंनी पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हि  कोरोनाची दुसरी लाट असून त्यामुळे तेथील  पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावून देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago