मुंबई : आज राज्यात पुन्हा राजकिय भूकंप होण्याची शक्यता आहे. आज अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता असून ते राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आत्ताची मोठी बातमी म्हणजे अजित पवार राजभवनात आता दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती मिळत असून तसे पत्र अजित पवारांकडे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अजित पवारांनी राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला असून त्यांच्यासोबत छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची दाट शक्यता आहे.
नुकतेच विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाल्या होत्या.