Categories: Previos News

Big Breaking News बोगस कागदपत्रे न्यायालयात देऊन जामीन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अनेकांची पुणे पोलिसांकडून धरपकड सुरू

पुणे : सहकारनामा

पुण्यातील विविध न्यायालयांत हजारो जणांना बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी  ताब्यात घेतलं असून शहरात अनेक ठिकाणी पुणे पोलिसांकडून  छापेमारी करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रेसकॉन्फरन्स घेऊन याबाबतची माहिती देण्याचे काम सध्या सुरू आहे.

पकडण्यात आलेल्या या टोळीने बोगस कागदपत्रे न्यायालयसमोर  देऊन अनेक आरोपींना जामिन मिळवून दिल्याची धक्कादायक बाब समोर येत असून जामीन करून घेणारे आरोपीही आता  पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

मिळत असलेल्या माहितीनुसार पुण्यातील शिवाजीनगर, लष्कर तसेच वडगाव मावळ कोर्टात जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तेवीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

कारवाई करण्यात आलेल्या तेरा जणांना पकडण्यात आल्याचीही माहिती मिळत असून बोगस जामीन घेणाऱ्यांची संख्या ही डोळे दिपावणारी असल्याचे माहितीतून समोर येत आहे. याबाबत लवकरच सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago