Categories: Previos News

BIG BREAKING NEWS – मुंबईतून अॅक्टेंमरा आणि रेमिडीसिव्हर इंजेक्शन आणून कुरकुंभ MIDC येथे काळया बाजाराने विकणारी टोळी LCB ने पकडली, 3 लाख 62 हजारांच्या मुद्देमालासह 3 आरोपी जेरबंद



| सहकारनामा |

पुणे : मुंबईतून दौंड तालुक्यातील कुरकुंभ MIDC येथे कोरोनावरील इंजेक्शन आणून ती काळ्याबाजारात विकणारी टोळी पुणे ग्रामिण च्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद

केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मा.पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्हयात कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्याची माहिती काढून कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची प्रत्येक विभागात पथके नेमण्यात आलेली होती.

त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दौंड पोलीस स्टेशनचे हद्दीत कुंरकुंभ एमआयडीसी, रिलायन्स कंपनीचे समोर ता.दौंड जि.पुणे येथे अॅक्टेंमरा व रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिघे आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ अॅक्टेंमरा व ६ रेमिडीसिव्हर असे एकूण ७ इंजेक्शन व इतर मुद्देमाल असा एकूण किंमत रुपये ३,६२,१७५/- चा माल जप्त केलेला आहे.

अॅक्टेंमरा व रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणेसाठी आलेले आरोपी नामे १) दत्तात्रय मारुती लोंढे (वय ३५ वर्षे रा.संम्मती अपार्टमेंट, प्लॅट नं. २०७, दौंड ता.दौंड जि.पुणे. मूळ रा.नवीन गार ता.दौंड जि.पुणे) २)अदित्य अनिरुध्द वाघ (वय २५ वर्षे रा.साईनाथनगर, पोफळे स्टेडीयमजवळ, निगडी, पुणे. मूळ रा.आणेवाडी ता.जि. सातारा) ३)अमोल नरसिंग मुंडे (वय रा.२५ वर्षे रा.कळवा नाका, सिध्दीविनायक सोसायटी, रुम नं.२०३, नवी मुंबई) हे तिघे अॅक्टेंमरा इंजेक्शन १,५०,०००/- रुपयाला व रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी २५,०००/- रुपयाला एक असे विक्री करीत असताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून १ अॅक्टेंमरा इंजेक्शन व ६ रेमिडीसिव्हर इंजेक्शन कि.रु. ६०,६७५/-, रोख रक्कम ५१,५००/- रुपये, तीन मोबाईल कि.रु. ३०,०००/-, होंडा अॅक्टीव्हा दुचाकी किं.रु.

७०,०००/- व सॅट्रो कार किं.रु.१,५०,०००/- असे एकूण ३,६२,१७५/-रु.चा माल जप्त करण्यात आला.

कोविड-१९ या साथीच्या आजाराचे औषध म्हणून वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शन बेकायदेशीररित्या, अवैध व गैर मार्गाने मिळवून ते काळया बाजाराने स्वत:चे अर्थिक फायदयासाठी कोणताही परवाना नसताना विक्री करणेसाठी जवळ बाळगून औषध विक्रेते नसतानाही खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादकाने ठरविलेल्या एम. आर.पी. किंमती पेक्षा जास्त चढया बाजाराने विक्री करताना मिळून आलेने तिघे आरोपींवर दौंड पोलीस स्टेशनला भादंवि कलम १८८, औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३(२)(सी), जिवनाश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ७(१)(ए)(ii), औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८(सी), २७(बी)(ii), २८, २२(१)(cca), २२(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. विवेक पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, सफौ. शब्बीर पठाण, पोहवा.महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, पोना. गुरु गायकवाड, पोहवा.मुकेश कदम, प्रमोद नवले, पोकॉ. अक्षय नवले, बाळासो खडके, प्रसन्न घाडगे यांनी केलेली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

21 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago