Categories: Previos News

Big Breaking News: देशातील गरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा.जाणून घ्या संपूर्ण योजनेची माहिती



नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशामध्ये जनतेला आर्थिक अडचण येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मोठी घोषणा करत 80 कोटी लोकांसाठी 1लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजची घोषणा करताना सर्वच बाबी लक्षात घेऊन या मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्योगधंदे ठप्प झाले असून अनेकांचे रोजगार, व्यवसाय बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

निर्मला सीतारामन यांनी आज  कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी Live पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेल्या विविध योजनांची माहिती दिली आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी पुढील महत्वाच्या घोषणा केल्या आहेत….

> कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिक आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

> पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुढील ३ महिने ८० कोटी लोकांना दर मानसी ५ किलो तांदूळ किंवा गहू देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये आणखी ५ किलोंची वाढ करण्यात आली आहे. तसेच १ किलो डाळही देण्यात येणार आहे.

> मनरेगातून ५ कोटी कुटुंबांना महिना २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मनरेगाच्या नागरिकांना मिळणारी बिदागी १८२ रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात येणार आहेत. याचा फायदा 8.69 करोड शेतकऱ्यांना होणार आहे.

> जनधन योजनेंतर्गत २० कोटी महिला खातेधारकांना महिना ५०० रुपये देण्यात येणार.

> उज्ज्वला योजनेंतर्गत ८.३ कोटी बीपीएल कुटुंबीयांना पुढील तीन महिने तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago