दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्धी येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय इसमाने कोरोना आजाराला कंटाळून रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज दि.2 जुलै रोजी पहाटे 5:30 दरम्यान घडली आहे. याबाबत आत्महत्या केलेल्या मृत कोरोना पीडिताच्या भावाने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीमध्ये त्यांच्या भावाला कोरोना आजाराची लागण झाल्यानंतर त्यांच्या भावाने खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊन ते बरे झाले होते. त्यामुळे त्यांना बोरीपार्धी या आपल्या गावी आणण्यात आले होते. काल दि.1 जुलै रोजी रात्री सर्वांनी जेवण केल्यानंतर कोरोनातून बरे झालेले फिर्यादीचे भाऊ आपल्या खोलीत झोपी गेले होते मात्र सकाळी उठल्यानंतर ते घरात दिसले नसल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांनी कोरोना आजाराला कंटाळून रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या भावास समजले. याबाबत त्यांनी यवत पोलीस ठाण्यात माहिती दिली असून यवतचे सहा.पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, हवालदार जितेंद्र पानसरे व विशाल जाधव हे तपास करत आहेत.
‛सहकारनामा’च्या ब्रेकिंग बातम्या पाहण्यासाठी आमच्या 9096777750 या नंबरला आपल्या whatsapp ग्रुपमध्ये सामील करा