Categories: क्राईम

दौंडमध्ये वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई.. 14 जणांवर गुन्हे दाखल तर तिघांना पोलीस कोठडी, 11 आरोपी झाले फरार

दौंड : दौंड महसूल व पोलिस प्रशासनाने दि. 25 मार्च रोजी शहरालगतच्या कचरा डेपो परिसरातील भीमा नदी पात्रात वाळू माफियांच्या अड्ड्यांवर धाड टाकीत अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या 20 यांत्रिक बोटी(1 कोटी 40 लाख रु) जिलेटिन च्या साह्याने उध्वस्त करीत मोठी कारवाई केली. कारवाईची चाहूल लागल्याने वाळूमाफियांनी आपल्या बोटी पाण्यातच सोडून पळ काढला, परंतु पोलिसांनी स्थानिकांकडून माहिती घेत त्या बोटींच्या मालकांची माहिती मिळवली व तब्बल 14 जणांवर पर्यावरण संरक्षण कायदा तसेच खाण व खनिज अधिनियम 1957 अन्वय गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पो. निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
मुकेश सोनवणे,अमोल जगताप,वैभव सोनवणे,, नवनाथ जगताप,(रा.
भीम नगर दौंड) किशोर शेलार,श्रीकांत मगर (रा. गार, श्रीगोंदा,जिल्हा नगर ),प्रशांत मगर,अण्णासो जगताप, चिक्या सोनवणे, बिया सोनवणे, राज सोनवणे, संजय सोनवणे, मिलिंद जगताप, प्रशांत भालेराव (सर्व राहणार दौंड) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. यापैकी मुकेश उर्फ विजय सुधाकर सोनवणे, नवनाथ आप्पा जगताप, किशोर शेलार (तिघे राहणार भीम नगर )यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर कारवाईमध्ये अटक करण्यात आलेला नवनाथ जगताप हा भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती जमाती विभागाचा दौंड शहर अध्यक्ष आहे. याचा आणि अवैध वाळू प्रकरणाचा काहीही संबंध नसताना पोलिसांनी चुकीच्या माहितीच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे असा आरोप भारतीय जनता पार्टी पक्षाचे दौंड शहराध्यक्ष फिरोज खान यांनी केला आहे. खान यांनी केलेल्या आरोपामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago