Bicycle thief – 1 लाख 55 हजार रुपयांच्या महागड्या सायकली चोरणाऱ्यास हडपसर पोलिसांकडून अटक



|सहकारनामा|

पुणे : सुमारे 1 लाख 55 हजार रुपयांच्या महागड्या सायकली चोरी करणा-या इसमास हडपसर पोलिसांनी अटक करून त्याकडून 14 सायकली जप्त केल्या आहेेेत.

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १९/०७/२०२१ रोजी फिर्यादी व्हिक्टर डेनिस अरुलदास (वय २५ वर्षे धंदा- नोकरी रा.व्हॉल्युव हायस्कुल, झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक ता.हवेली जि.पुणे) यांची सायकल चोरी गेल्याने हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे शहरात सध्या महागड्या सायकली फिटनेस करीता वापरण्याचा ट्रॅन्ड चालु असून अशा सायकली वापरणा-यांची संख्या देखील वाढत आहे. तसेच हडपसर पोलीस स्टेशनच्या लगतच असणारे

ग्लायडींग सेंटर, भोसले गार्डन, येथे मगरपट्टा सिटी, मांजरी, हडपसर लगतचा परिसरात खुप मोठया प्रमाणावर लोक हे सायकली चालविण्यासाठी येत असतात. लोकांमध्ये सायकली वापरणा-यांची संख्या

वाढत असतानाच सायकल चोरीचे प्रमाणामध्ये सुध्दा वाढ झाल्याने मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री बाळकृष्ण कदम यांच्या निदर्शनास आल्याने अशा चोरटयांना पकडुन योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले होते.

त्यामुळे दाखल गुन्ह्याचा तपास मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे करीत असताना, पोलीस अंमलदार समीर पांडुळे व प्रशांत दुधाळ यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम आशिक जिवन आले (वय २४ वर्षे रा.सं नं ३७, ससाणे कॉलनी, घर नं. ५५८, केशवनगर, मुंढवा, पुणे. मुळगाव- मु.पो. मंगपु, जिल्हा – दार्जीलिंग राज्य- पश्चिम बंगाल) याच्याकडे दाखल गुन्हयाचे संदर्भाने तपास केला असता त्याने हडपसर, चंदननगर भागातुन सायकली चोरी केल्याचे सांगीतले. 

नमुद आरोपीकडून एकुण १४ सायकली ज्यांची किं.रू १,५५,०००/- असून त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच तपासादरम्यान आरोपीकडुन चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन चोरीस गेलेली सायकल हि मिळुन आल्याने ती जप्त

करण्यात आलेली आहे.

आरोपीकडे तपास करीत असताना त्याने सदरच्या सायकली ह्या त्यास कोरोना काळात काहिएक कामधंदा नसल्याने व पैशांची अडचण असल्याने सायकलीला नंबर नसतात व त्याचे लॉक तोडणे सोपे जाते त्यामुळे त्याने सायकली चोरी केल्याचे सांगितले. 

दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार समीर पांडुळे हे करित आहेत.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांचे पथकाने केली आहे.