Bhima Patas : जोपर्यंत कुलांच्या ताब्यात कारखाना तोपर्यंत आंदोलन करत राहणार, मात्र निवडणूक लढवणार नाही-माजी आ.रमेश थोरात !कारखाना सुरू होणार आणि चांगल्या पद्धतीने बाजारभाव हि देणार : आ.कुल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना पाटस हा जोपर्यंत आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात आहे तोपर्यंत आपण आंदोलन करत राहू अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आ.रमेश थोरात यांनी दिली.

भीमा सहकारी साखर कारखाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर ते पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हि माहिती दिली. तसेच आपण कारखान्याची निवडणूक लढवणार का या प्रश्नावर त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.

दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना हा तालुक्यातील एकमेव शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा सहकारी साखर कारखाना असून या करखाण्याचे अध्यक्ष विद्यमान आमदार राहुल कुल हे आहेत. त्यांच्या पॅनलला सलग 5 निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांनी निवडून देत अध्यक्षपद बहाल केले आहे.

कारखाना सुरू होणार आणि चांगल्या पद्धतीने बाजारभाव हि देणार : आ.कुल 

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आ.रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली भीमा पाटस कारखान्यावर आंदोलन केल्यानंतर तालुक्याचे आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांना याबाबत प्रश्न विचारला असता भीमा पाटस कारखाण्याचे गाळप सुरू होईल आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभावही मिळेल अशी माहिती आ.कुल यांनी दिली.