शेतकऱ्यांच्या 19 इलेक्ट्रिक मोटारी, इंजिन चोरणारी टोळी पकडण्यात भिगवण पोलीसांना यश, 3 मोटार सायकल, 10 मोबाईल, इंजिन, टीव्ही, फ्रीज चोरणारेही जाळ्यात

भिगवण : भिगवण परिसरातून शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी आणि इंजिन चोरी करणारी चोरट्यांची टोळी पकडण्यात अखेर भिगवण पोलिसांना यश आले आहे. या टोळी बरोबरच मोटार सायकल, टीव्ही, फ्रीज चोरणारे चोरटेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. या कारवाईत शेतकऱ्यांचा चोरीस गेलेल्या पाण्यातील १९ इलेक्ट्रीक मोटारी, १ इंजिन, ३ मोटार सायकली, १ फ्रीज, १ एल. सी. डी. टीव्ही व हरवलेले १० मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चोरी करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद करून त्यांच्याकडुन ८ लाख ९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आला आहे.

दिनांक १९/०७/२०२३ रोजी रात्री ११ ते पहाटे ०७:०० च्या दरम्यान डाळज नंबर २ या गावचे हद्दीत अवुधत दादासाहेब जगताप, (रा. डाळज नंबर. २, ता. इंदापुर, जि. पुणे) यांच्या मालकिची टेस्को कंपनीची १२.५ एच.पी. ची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली होती. त्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिगवण परीसरामधुन शेतकऱ्यांच्या पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटार चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांवर अगोदरच दुष्काळाचे सावट असताना त्यामधुन त्यांच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी वर्ग हा हवालदिल झाला होता.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून ते गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहा. पोलीस निरीक्षक, यांनी गुन्हे शोध पथक (डी.बी) यांना मार्गदर्शन केले. भिगवण पोलीस स्टेशन येथे वरील प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास चालु असताना गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी १) विश्वजीत उर्फ सुंदर तुकाराम ढवळे, (वय २३ ) २) रोहन उर्फ सखराम डोंबाळे, (वय २१, दोघे रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे) यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाचा सखोल तपास केला असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली देत या गुन्ह्यातील १९ इलेक्ट्रिक मोटार, इंजिन व इतर असा चोरीस गेलेला मुद्देमाल काढुन दिला. या आरोपींकडे अधिक विचापुस केली असता त्यांनी भिगवण परिसरात दाखल असलेल्या १२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

मोटार सायकल, फ्रीज, एल. सी.डी. टी. व्ही. हस्तगत भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पेट्रोलींग करीत असताना त्यांना एक मोटार सायकलवरून दोन इसम संशईतरीत्या गाडीवर इलेक्ट्रीक फ्रीज व एल. सी. डी. टीव्ही घेवुन जात असताना दिलसे असता त्यांना थांबुन त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यातील वस्तूंबाबत विचारपुस केली असता ते उडवाडविची उत्तरे देवु लागले त्यावेळी पोलिसांना खात्री झाली की सदर इसमांनी या वस्तु कोठुन तरी चोरी केल्या असव्यात म्हणुन १) नितीन सखाराम हरीहर, (वय. ३३ वर्ष) २) सलीम मेहबुब शेख, (वय २५ वर्ष, दोघे रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे) यांचेविरूध्द भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नंबर. ३६०/२०२३, मुंबई पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांनी आणखी दोन मोटार सायकली काढुन दिल्या. अशा प्रमाणे सदर आरोपी यांचेकडुन ३ मोटार सायकली, १ इलेक्ट्रीक फ्रिज व १ एल. सी. डी. टी. व्ही असा एकुण २,०५,०००/- रू किंमतीचा मुदमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी यांनी सदरच्या वस्तु कोठुन चोरी केल्या आहेत याबाबत सखोल तपास चालु आहे.

हरवलेले १० मोबाईल हस्तगत : भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेले विविध कंपनीचे मोबाईल यांचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेवुन त्यातील एकुण १० मोबाईल अंदाजे किंमत ३,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी अंकित गोयल (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) आनंद भोईटे ( अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण), गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, (सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे) तसेच भिगवण पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमलदार विठठ्ल वारगड, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, आप्पा भांडवलकर यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विठठ्ल वारगड, महेश उगले हे करीत आहेत.