दौंडमध्ये भारतरत्न, राष्ट्रसंत मदर तेरेसा जयंती उत्साहात साजरी

अख्तर काझी

दौंड : भारतरत्न -राष्ट्रसंत मदर तेरेसा यांची जयंती दौंड शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. मा.नगराध्यक्ष योगेश कटारिया यांच्या हस्ते संत मदर तेरेसा यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जयंतीनिमित्ताने, रेल्वे पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष एम. जी .शुक्ला, बि .डी. तिवारी, विवेक संसारे, भारत सरोदे, नागसेन धेंडे, अश्विन वाघमारे, रतन जाधव ,नरेश डाळिंबे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रसंत मदर तेरेसा यांच्या महान कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या कार्यामुळे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. गरीब निराधार गरजू कुष्ठरोगी लोकांची प्रामाणिक सेवा केल्यामुळे युनो ने त्यांना नोबेल पारितोषिक देऊन सन्मान केला. भारतानेही त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. अशा शब्दात उपस्थितांनी त्यांचा गौरव केला.

संत मदर तेरेसा सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मोजेस पॉल यांनी रेल्वे पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनला मदर तेरेसा यांचे तैलचित्र भेट दिले. यावेळी पांडुरंग गायकवाड ,वाय. डी .चतुर्वेदी, सोलोमन अबनीस ,शरद जाधव, डॉमिनिक पॅट्रिक, विनय खरात, शामराव नवगिरे ,सोमा मासाळ ,सुहास शिंदे, विनोद भालसेन, सुधीर वाघमारे ,अजिंक्य गायकवाड, जॉन परमार, उमेश वीर, मार्था जॉन, कुमार पॉल, मार्गरेट पॉल, जेसन थॉमस आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक मोजेस पॉल व भारत सरोदे यांनी सूत्रसंचालन केले. जयंतीनिमित्ताने आयोजकांच्या वतीने यावेळी अन्नदान करण्यात आले.