यवत पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसाला धक्काबुक्की, दोघांवर गुन्हा दाखल

यवत : यवत पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना घडली असून याबाबत यवत पोलीस ठाण्यात दोन इसमांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजिंक्य दिलीप दौंडकर, (पोलीस.नाईक ब.नं. 2069 यवत पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यवत (ता. दौंड. जि. पुणे) गावच्या हददीत असणाऱ्या यवत पोलीस स्टेशनच्या आवारात दिनांक 26/1/2022 रोजी 14ः30 वाचे सुमारास आरोपी 1) धुळा किसन टेळे 2) दादा किसन टेळे (दोन्ही रा. टेळेवाडी ता. दौड जि.पुणे) असे दोघे इसम हे शंकर केरू टेंगले यांच्या सोबत चालु असलेल्या शेतजमीनीच्या वादावरून त्यांच्यासोबत आपापसात मोठमोठयाने बोलुन आरडा-ओरडा करीत असल्याने फिर्यादी हे त्यांच्या जवळ जावुन त्यांना मी पोलीस असल्याचे सांगुन तुम्ही पोलीस स्टेशन येथे आरडा ओरडा करुन वाद करुन नका असे समजावुन सांगत असताना दादा किसन टेळे याने तु पोलीस असला म्हणजे काय झाले तु आमचा वाद मिटवणार आहेस का…? तुला काय केस करायची ती कर… आम्ही बघतो…! आम्ही येरवडा जेलमध्ये बसतो असे म्हणुन पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालुन मला हाताने धक्काबुकी केली. तसेच धुळा टेळे याने त्यांची शर्टची काॅलर धरुन तु त्या माणसाला पहीले अटक कर नंतर माझे सोबत बोल अशी आरेरावीची भाषा बोलुन दोघांनी ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा करून पोलिसाला धक्काबुक्की केल्याने यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अंमलदार संतोष कदम, पोलीस हवालदार हे करीत आहेत.