beaten mother-in-law – ‛सुने’ ने घातला ‛सासू’ च्या डोक्यात ‛दगड’, सुनेवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



|सहकारनामा|

दौंड : दुकानाच्या किरकोळ कारणावरून सुनेने सासूच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केल्याची घटना दौंड शहरात घडली आहे. या प्रकरणी सासूच्या फिर्यादीवरून सुनेवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 28 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजता यातील फिर्यादी चतुराबाई श्रीरंग गायकवाड ( 61 वर्षे, रा.वरदविनायक सोसायटी शेजारी श्रीकुंज निवास दौंड) या त्यांचा धाकटा मुलगा सुभाष हा घरी नसलेने त्या किराणा दुकानाला कुलुप लावत असताना त्यांच्या थोरल्या मुलाची पत्नी प्रज्ञा दिलीप गायकवाड ही तेथे आली व तुम्ही दुकानाला कुलुप का लावताय, तुम्ही दुकानाला कुलुप लावायचे नाही, तुम्ही येथुन निघुन जा असे म्हणुन जवळच पडलेला दगड हातात धरून फिर्यादी यांच्या  डोक्यात घातला आणि

म्हातारे येथुन निघुन जा नाहीतर जिवे

मारून टाकीन असे म्हणुन पुन्हा हाताने,

लाथाबुक्यांनी मारहान करून शिविगाळ

दमदाटी करून आपखुशीने दुखापत केली असे चतुराबाई गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सासूच्या या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी सुनेवर  गुन्हा दाखल केला असून पुढील तपास दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.