सरकार भांडने लावू शकते सावध रहा | ज्यांना पोटशूळ उठला असेल त्यांनी आरक्षण घेऊ नये मात्र आरक्षणाला विरोध करू नये – मनोज जरांगे पाटील

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना, मराठ्यांच्या सुनामीपुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं. तेवढे मीडियावाले आमच्या बाजूने आहेत बाकी कुणी नाही. सरकार म्हणतं होत मराठ्यांच्या नोंदी नाहीत, मराठ्यांकडे पुरावे नाहीत. सरकारनी पाळलेल्या बगलबच्यांनी हे पुरावे स्वतःच्या बुडाखाली झाकून ठेवले. समित्या, आयोग नेमले पण मराठे ओबीसी आरक्षणात असतानाही मराठ्यांची नोंद कुणालाच सापडली नाही. पुरावे नाहीत म्हणून सांगितले गेले. 1967 ते 2023 पर्यंत न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने पुरावे शोधन्यास सुरुवात केली आणि मराठे ओबीसीत असल्याचे लाखाने पुरावे सापडले. मराठ्यांचे पुरावे लपवून का ठेवले असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी वरवंड येथील जाहीर सभेत उपस्थित केला.

वरवंड येथील जरांगे पाटील यांची जाहीर सभा

मराठा समाजाला मुद्दाम आरक्षण मिळू दिले नाही जरांगे पाटील यांनी पुढे बोलताना, ओबीसी नेत्यांच्या प्रभावामुळे मराठा आरक्षण पुढे येऊ दिले नाही. राजकीय व्यक्तींनी आरक्षणाचे पुरावे लपवून ठेवले आणि मराठा समाज जागा झाल्यानंतर सरकार जागेवर आलं, समिती काम करू लागली आणि लाखो पुरावे समोर आले. अगोदर समितीनी काहीच काम केले नाही. समिती काम करीत नव्हती फक्त हौद्राबाद, मुंबई, संभाजीनगर असे दौरे करायची मग अंतरवालीतून पुन्हा आपण सरकारला जाब विचारला आणि राज्यात लाखान पुरावे सापडले. माझ्याबद्दल सरकारचा भयाण विचार होता. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. मराठ्यांच्या लेकरांना न्यान मिळण्यासाठी हा मराठा पेटून उठला आहे आणि येत्या 24 डिसेंबरला आरक्षण घेऊन राहणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कुणाचा आधार नाही, सरकार भांडणे लावू शकते.. आपल्यासाठी कोणी पुढे यायला तयार नाही त्यामुळे आपणच आपल्याला साथ देऊन लढायचं आहे आणि त्यामुळे आता 70 टक्के लढाई आपण जिंकली असल्याचे जरांगे यांनी म्हणत राजकीय मंडळींनी साथ दिली असती तर 40 वर्षापूर्वी आरक्षण मिळाले असते मात्र त्यांनी फक्त आपला वापर केला आणि यात आपली चूक ही होती की आपण यांच्यावर विश्वास ठेवून यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत राहिलो. सरकार आणि सरकारचे काही आपले कार्यकर्ते आपल्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. सरकारपुढे आता एकच पर्याय उरला असून ते आता आपल्यात भांडणे लावू शकतात त्यामुळे आता आपल्या लोकांना विनंती करा. सरकारला 24 डिसेंबरला ओबीसीतून आरक्षण जाहीर करावे लागणार आहे आणि जर तसे झाले नाही तर सरकारला खूप जड जाईल हेही लक्षात ठेवावे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गाव तिथे साखळी उपोषण सुरु राहिल असे त्यांनी जाहीर केले.

आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जरांगे-पाटलांचे खडे बोल ज्यांना पोटशूळ झाला असेल त्यांनी आरक्षण घेऊ नये असे म्हणत विरोध करणाऱ्यांनी भान ठेवावे. तुम्हाला आरक्षण नको असेल तर नका घेऊ पण समाजातील इतरांचे नुकसान करू नये असे खडे बोल त्यांनी आरक्षणास विरोध करणाऱ्या समाजातील काहींना सुनावले. सरकार आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल, सावध रहा… सरकार आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करेल त्यामुळे आपापसात ताळमेळ ठेवा आणि 24 डिसेंबर पर्यंत सावध रहा त्यापुढे काय करायचे ते आपण पाहू असे जरांगे पाटील यांनी म्हणत मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असे त्यांनी दौंड शहरात बोलताना सांगितले. ते वरवंड येथील सभेला जात असताना दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यास थांबले होते त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

राज ठाकरेंना जरांगे पाटलांचे प्रतिउत्तर निवडणुकीच्या तोंडावर जातीवाद आणला जातोय, यामागे कोण आहे हे कालांतराने पुढे येईल असे राज ठाकरे हे आज बोलले होते. याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी, माझ्या मागे कोण हे शोधून काढा, माझ्या मागे फक्त मराठा समाज आहे असे राज ठाकरे यांना प्रति आव्हान देत मराठा समाजाला आरक्षण मिळायला लागले की खोटे नाटे आरोप केले जातात, खोट्या पुड्या सोडल्या जातात. मात्र आता मराठा समाजाला खात्रीपूर्वक आरक्षण मिळणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.