Baramati – शासकीय यंत्रना आणि नागरिकांच्या सहकार्यानं कोरोना संकटावर लवकरच मात करू : उपमुख्यमंत्री अजित पवार



– सहकारनामा

पुणे : 

आज दि.16 एप्रिल रोजी बारामतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी युद्धपातळीवर करावी असं सूचित केलं.

शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्यानं कोरोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सद्यस्थितीत बारामती शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांभीर्यानं घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हणत 



सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचं असल्याचं असं स्पष्ट केलं. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनानं कठोर निर्बंध लावले आहेत. नागरिकांकडून त्या निर्बंधांचं पालन केलं जाईल, यासाठी दक्ष राहून काम करा. सार्वजनिक ठिकाणी तसंच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणं आवश्यक आहे, अशा सूचना देखील त्यांनी केल्या. 

लसीकरणाचा वेग वाढवावा, वैद्यकीय सामग्री आणि औषधांची तसंच निधीची कमरतरता पडू दिली जाणार नाही, असं स्पष्टपणे जाहीर करताना सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावं व प्रशासनास सहकार्य करावं, ऑक्सिजनबाबतही सर्व रूग्णालयांनी काळजीपूर्वक त्याचा वापर करावा, अशा सूचना शेवटी त्यांनी केल्या.