पुणे : 10 महिन्यापासून मिसिंग व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाला यश आले आहे. या खुनातील 4 आरोपी जेरबंद करण्यात आले असून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे.
पुणे ग्रामीण चे पोलीस
अधीक्षक अंकित गोयल
यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे दिनांक 19/02/2022 रोजी फिर्यादी वृषाली वैभव यादव
(वय 23 वर्षे
) यांनी त्यांचा पती वैभव विठ्ठल यादव वय 31 वर्षे हा मिळून येत नसलेने मानव मिसिंग रजिस्टर नंबर 19/2022 प्रमाणे
जो गुन्हा दाखल होता. सदर मिसींगचा योग्य तो तपास करणे बाबत
त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस
सूचना केल्या होत्या.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शेळके यांनी मिसिंगचे तपासा करीता एक तपास पथक तयार करून त्यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना सदर मिसिंग बाबत घातपात घडला
असल्याची माहिती
त्यांना मिळाली. सदर मिसिंगची सखोल चौकशी केली असता वैभव विठ्ठल यादव याची पत्नी वृषाली वैभव यादव हीचे वडगाव निंबाळकर येथील रोहीत दत्तात्रय खोमणे
याच्या सोबत अनैतिक संबंध असुन पत्नी वृषाली हिनेच मित्र रोहित व त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने पती वैभव याचा खून केला असलेबाबत खात्रीशीर
माहिती पथकाला मिळाली.
त्याप्रमाणे
पोलिसांनी वडगाव निबाळकर येथील एसटी स्टँड परिसरात सापळा रचून रोहीत यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे मिसिंगचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता (1) रोहित दत्तात्रय खोमणे
(रा. उमाजी नाईक चौक, वडगाव निंबाळकर, ता.बारामती, जि. पुणे
) (2)
वृषाली वैभव यादव
(वय 23 वर्षे,रा.
वडगाव
निंबाळकर,ता.बारामती, जि.पुणे
) ही
च्यासह त्याचे दोन साथीदार (3) शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सूर्यवंशी
(वय 23 वर्षे,रा. वडगाव तुकाई माता चौक, ता. बारामती, जि. पुणे
) (4) सागर सर्जेराव चव्हाण
(वय 27 वर्षे,रा. वडगाव निंबाळकर,ता.बारामती, जि.पुणे
) यांनी मिसिंग व्यक्ती वैभव यादव यास मारहाण करून पाडेगाव येथील कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे
सांगितले. सदर बाबत अधिक माहीती घेतली असता लोणंद पोलीस स्टेशन मध्ये आकास्मात मयत रजिस्टर नंबर 13/2022 प्रमाणे दाखल असुन त्याची ओळख पटलेली आहे.
त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले असुन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक, अंकित गोयल साो. मा. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. गणेश इंगळे सो. यांचे मागदर्शना खाली
पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके
पो.स.ई.श्री.शिवाजी ननवरे
पो.हवा.सचिन घाडगे
पो.हवा.अजित भुजबळ
पो.हवा.राजु मोमीन
पो.हवा.विजय कांचन
पो.हवा.अजय घुले
पो. ना.धिरज जाधव
तसेच निंबाळकर पोलीस स्टेशनचे
सहा.पो.नि.सोमनाथ लांडे
पो.ना. हिरामण खोमणे
पो.ना. पोपट नाळे
पो.ना. अमोल भुजबळ
यांनी केली आहे.