Categories: Previos News

Baramati Supe Covid Care Center – बारामती तालुक्यातील सुपे येथे लवकरच कोविड केअर सेंटर होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश



| सहकारनामा | अब्बास शेख |

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बारामतीमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. 

या बैठकीत बारामती तालुक्यातील सुपे येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी अजित पवारांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा, ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्या, रेमडेसिवीर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा, असं सूचित केलं. 

शासनानं प्रशासनास कडक निर्बंध लावण्याबाबतचे पूर्ण अधिकार दिले आहेत त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणा-यांवर प्रशासनानं दंडात्मक कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, त्यासाठी मनुष्यबळ कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी आणि लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago