बारामती : बारामती शहरामध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद होऊन त्याचे पर्यावसन काठीने हाणामारीमध्ये झाल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रसाद राजेंद्र डमरे (रा.सातव वस्ती ता.बारामती) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार आरोपी दीपक रामभाऊ साळूखे, रामभाऊ साळूखे (रा.सातव वस्ती, ता.बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दीपक रामभाउ साळुखे यांना फिर्यादी यांचे वडील राजेंद्र डमरे यांनी तुम्ही
रस्त्यावर लहान मुलांना घेवुन किकेट खेळु
नका असे सांगत असताना त्यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची चालु झाली. त्यावेळी रामभाउ
साळुखे यांनी फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करू लागल्याने फिर्यादी हा भांडणे सोडवण्यास मध्ये गेला असता रामभाउ साळुखे यांनी जवळ
पडलेली काठी घेवुन तुमच्याकडे बघतो,
तुम्हाला सोडणार नाही असे म्हणुन फिर्यादी यांच्या वडीलांच्या अंगावर मारण्यासाठी धावुन गेले त्योवळी फिर्यादी मध्ये गेला असता आरोपीचा मुलगा दिपक याने फिर्यादिस शिवीगाळ, दमदाटी करून पकडून ठेवत रामभाऊ साळूखे याने हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यात काठीने मारहान करत दुखापत केली.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सफौ सोनवलकर करीत आहेत.