Categories: क्राईम

बारामती | बायकोला राग अनावर झाला अण झोपलेल्या नवऱ्याच्या गुप्तांगावर उकळते पाणी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, नवरा 40 टक्के भाजलेला असताना पुन्हा लोखंडी पाईपने मारहाण

बारामती : नवरा बायकोचे भांडण कधी कोणते रूप धारण करेल सांगता येत नाही. मग यात कधी नवऱ्याकडून बायकोला जीवे मारण्याचा प्रयत्न होतो तर कधी कधी बायकोही नवऱ्याला मागचा पुढचा विचार न करता जीवे मारायलाही कमी करत नाही. अशीच एक घटना बारामती तालुक्यातील पारवडी या गावात घडली असून प्रापंचिक वादातून पत्नीने पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या दोघांना दोन मुळे असून एक चौथी मध्ये तर एकजण सहावी मध्ये शिकत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:30 वाजता फिर्यादी सागर मधुकर कुंभार (वय 35, रा.पारवडी, जाधव वस्ती ता. बारामती) हा त्याच्या घरात झोपलेला असताना त्याची पत्नी आरोपी सौ.कविता सागर कुंभार (वय 28 रा. पारवडी, जाधव वस्ती ता. बारामती) हीने प्रापंचिक कारणावरुन रागाच्या भरात आपल्याला नवऱ्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने उकळते गरम पाणी त्याच्या तोंडावर, छातीवर, पोटावर, गुप्तइंद्रिय व पाठीमागील गुदद्वारा जवळील भागावर टाकले.

झोपेत असताना अचानक झालेल्या या हल्ल्यात सागर कुंभार हा ४० टक्के भाजला मात्र तरीही त्याच्या पत्नीने पुन्हा तेथे पडलेल्या लोखंडी पाईपने त्याच्या डोक्यात, पाठीवर मारहाण करुन त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मारहाण करीत असताना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत ती त्याच्यावर हल्ला करीत असल्याचे सागर कुंभार याने आपल्याला फिर्यादीत म्हटले आहे. सागर कुंभार याच्या फिर्यादीवरून त्याची पत्नी कविता कुंभार हिच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

13 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago