Baramati – बारामतीमध्ये मोकाट फिरणाऱ्यांची पोलिसांनी केली अँटीजेन टेस्ट, 71 पैकी 6 जण निघाले पॉझिटिव्ह



| सहकारनामा |

बारामती : 

बारामती शहर आणि परिसरामध्ये मोकाट फिरणाऱ्यांना बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी 71 जणांना पकडून त्यांची अँटीजेन टेस्ट केली असता त्यामध्ये  06 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. 

दि.27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्या पासून  हि कारवाई सुरू होती. पोलिसांनी मेडिकल कॅम्पच्या मदतीने पेन्सिल चौक येथे शहरात मोकाट फिरणाऱ्या लोकांच्या अँटीजेन टेस्ट केल्या त्यामध्ये वरील प्रमाणे 06 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले. सदर पॉझिटिव्ह लोकांना प्रमाणपत्र देऊन सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे उपचाराकरिता  पाठवण्यात आले.

सध्या राज्यात कोरोनाचा थैमान सुरू असून नागरिकांनी घरातच बसावे असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेद्वारे वेळोवेळी केले जात आहे, मात्र तरीही अनेकजण या आवाहनाला हरताळ फासून मोकाट फिरण्याचा आनंद घेताना दिसतात.अश्याच मोकाट फिरणाऱ्या लोकांवर आता पोलिसांकडून कारवाई केली जात असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांनीही केले आहे.