सांगली जिल्ह्यातील बळीराजा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने, सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मागणीला जोर

सुधीर गोखले

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील शेतकरी (farmer) आता सौर उर्जेद्वारे (electricity power project) आपल्या शेतीमध्ये विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होताना दिसून येत आहेत. सांगली जिल्ह्यातून सौर ऊर्जेच्या पर्यायाची निवड शेतकरी वर्ग करत आहे तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यामध्ये जवळजवळ २५० उपकेंद्रांची निवड करून १२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले जाणार असून पुढील दोन वर्षात हे प्रकल्प उभे राहतील असा अंदाज आहे.

या प्रकल्पामुळे दिवसभरातील वीज आणि रात्री शेतीला पाणीपुरवठ्यासाठी लागणारी वीज विनासायास शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. सांगली जिल्ह्यातील शेतीपंप वापर करणाऱ्या विद्युत ग्राहक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. वर्षाला सुमारे २१०० दशलक्ष युनिट वीज वापर होत असतो. तरीही हा पुरवठा सध्या कमी पडत आहे. दिवसा विद्युत पंपांना वीज मिळत नाही पुरवठा अपुरा पडत आहे याचा विचार करून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प योजनेचा २ रा टप्पा हाती घेत सन २०२५ पर्यंत शेतीवरील विद्युत भार असणाऱ्या वीज वाहिन्यांचा ३० टक्क्यांपर्यंत सौर ऊर्जांमध्ये रूपांतरित करण्याचे नियोजन आहे.

यासाठी शासनाला पुरेशी जागाही लागणार आहे यासाठी विविध मार्गाने शासन जमिनीचा शोध घेत आहे जिल्हा प्रशासकडे असणाऱ्या जमिनी मिळण्यासाठी प्रस्ताव दिले गेले आहेत तर खाजगी मालकीच्या जमिनी मिळवण्यासाठी भाडे पट्ट्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहनही केले जात आहे या साठी लागणारी जमीन अकृषक म्हणजे एन ए करण्याची गरज नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे तसेच अशा जमिनींना स्थानिक स्वराज संस्था आणि महसूल विभाग कडून करांमध्ये तीस वर्षासाठी सूट मिळणार आहे.

प्रोत्साहनपर आर्थिक मदत
या मध्ये फिडरवर जोडणी करणाऱ्या सौर ऊर्जेतील प्रकल्प धारकाला जोडणी केल्यापासून ३ वर्षासाठी अनुक्रमे ११ आणि २२ केव्ही साठी २२ पैसे प्रतियुनिट तर ३३ केव्ही साठी १५ पैसे प्रति युनिट आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच उपकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुदानही दिले जाईल जर ग्रामपंचायतीं च्या आवारात असे प्रकल्प असतील तर त्यांना ५ लाख दर वर्षी दिले जातील.