आंतरराष्ट्रीय :
लेबनानची राजधानी असलेल्या बैरुतमध्ये भीषण स्फोट झाले आहेत. या स्फोटांमध्ये किमान 70 जण ठार झाले असून आत्तापर्यंत 4 हजारांपेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
या घटनेनंतर लेबनानचे पंतप्रधान हसन दिआब यांनी अतिशय दुःख व्यक्त करत 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
ही घटना कशी घडली याबाबत तपास सुरू करण्यात आला असून हे स्फोट अमोनियम नायट्रेटमुळे झाले असल्याचे असल्याचे सांगितले जात असून
लेबेनानचे अध्यक्ष माइकल इऑन यांनी केलेल्या ट्विटमुळे हे स्फोट असुरक्षितपणे ठेवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटमुळे झाले असल्याचे समजत आहे. अध्यक्षांनी केलेल्या ट्वीटमध्ये 2 हजार 750 टन अमोनिअम नायट्रेट असुरक्षितपणे ठेवणं अजिबात स्वीकारार्ह नाही असे ट्विट करून या स्फोटावर प्रकाश टाकला आहे.
बीबीसी या वृत्तवाहिनेच्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोट घडलेल्या ठिकाणी अक्षरशः मृतांचा खच पडला होता. तर अन्य वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार जवळपास असणाऱ्या रहिवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले. स्फोट किती जबरदस्त होते याचा अंदाज या स्फोटांचे आवाज समुद्रात 240 किमी दूरपर्यंत ऐकू गेले असल्यावरून लावण्यात येऊ शकतो.