अब्बास शेख
पुणे : दौंड चे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांना जामिन मंजूर करण्यात आला असून यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. मात्र अजून एक गुन्हा त्यांच्यावर दाखल असून त्यामध्ये ते सह आरोपी असल्याने जो पर्यंत त्यामध्ये त्यांचा जामिन होत नाही तोपर्यंत त्यांचा मुक्काम येरवडा कारागृहातच होणार आहे.
दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यावर फिर्यादीकडून भादवी कलम 307,354,325,आर्मॲक्ट आणि ॲट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे बादशहा शेख यांनी त्यांचे वकील ॲड. समीर शेख आणि ॲड.अझहरुद्दीन मुलाणी यांच्यामार्फत बारामतीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात अगोदर अटकपूर्ण जामिन अर्ज केला होता तो फेटाळला गेल्यानंतर बादशहा शेख यांना अटक करण्यात आली होती.
बादशहा शेख यांना अटक झाल्यानंतर ॲड. समीर शेख व ॲड. अझहरुद्दीन मुलाणी यांनी बारामती न्यायालयात युक्तिवाद करत त्यांचा जामिन अर्ज मान्य करण्याची मागणी न्यायालयाला केली होती. आरोपिंच्या वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरत बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांनी जामिन मंजूर केला आहे. मात्र बादशहा शेख यांना अजून एक गुन्ह्यात जामिन मिळाल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका होईल अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.