Categories: राजकीय

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

दौंड : विधानसभेचे वारे घोंगावू लागले आहे. कार्यकर्ते आपल्या नेत्याविषयी बेरीज वजाबाकीची गणिते करू लागले आहेत. आता यात भर पडली आहे रमेश थोरात यांचे ३४ वर्षांपासूनचे कट्टर कार्यकर्ते दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांची. गेल्या ३४ वर्षांपासून बादशाह शेख हे दौंड नगरपरिषदेला निवडून येत आहेत. त्यांनी पत्रकारांना मुलाखत देताना आपण विधनसभा नुवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या विधाणामुळे दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटात खळबळ माजली आहे. तर कुल गट त्यांच्या राजकीय हालचालिंवर सावध पवित्रा घेताना दिसत आहे.

बादशाह शेख यांनी बोलताना, मी गेली ३४ वर्षे ज्यांचे काम केले त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला त्यावेळी वाऱ्यावर सोडले ज्यावेळी माझी काही एक चूक नसताना मला ५२ दिवस जेलमध्ये बसावे लागले. विरोधकांनी मला गुंतवले असा आरोप होतो पण मी ज्यांच्यासाठी ३४ वर्षे इमाने, इतबारे काम केले त्यांनी त्यावेळी माझ्यासाठी काय केले असा सवाल बादशाह शेख यांनी उपस्थित केला आहे. मी कैलासवासी आमदार सुभाष आण्णा कुल, माजी रंजनाताई कुल आणि माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचेही काम केले आहे. मात्र प्रत्येकवेळी कुल-थोरात हीच नावे पुढे येतात. तिसरे नाव पुढे येऊ दिले जात नाही आणि जी नावे आता पुढे येत आहेत त्यामध्ये एकही बहुजन नाव पुढे येताना दिसत नाही.

त्यामुळे वर्षानुवर्षे निवडून येणाऱ्या या सर्वांनी मिळून एकदा विधानसभेला एक बहुजन समाजाचा चेहरा दिला तर हरकत नाही मात्र तसे होताना दिसत नाही. ज्यावेळी मला नाहक एका प्रकरणात अटक केली गेली त्यावेळी मी ज्यांच्यासाठी इतर लोकांचा कायम वाईटपणा घेऊन काम केले त्यांच्याकडून मला आणि माझ्या कुटुंबाला त्यावेळी लागणारी मदत केली गेली नाही हा अनुभव आपणांस आल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषदेला सलग आमच्या सारख्या सहा-सात वेळा निवडून आलेल्या लोकांवर ही परिस्थिती येत असेल तर सर्वसामान्यांचे काय..? त्यामुळे आता स्वतःची ताकत स्वतःच तयार करावी लागेल दुसऱ्यांवर विसंबून राहून काही फायदा नाही. आता आपण एकतर मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील, वंचित बहुजन आघाडी किंवा अन्य पक्षांकडून निवडणूक लढविण्यावर विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

24 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago