Categories: Previos News

Bad – ऐन कोरोना काळात केडगाव, बोरीतील पतसंस्था, को.ऑपरेटिव्ह बँका उठल्या नागरिकांच्या मुळावर, लॉकडाउन काळात खाती लॉककरून खाजगी सावकारांनाही लाजवले!



– सहकारनामा

दौंड : सध्या राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सध्याचा काळ हा सर्वांसाठीच मोठा कठीण काळ आहे, अगोदरच बेकारी आणि बेरोजगारीने लोकांचे कंबरडे मोडले असताना आता या परिसरातील काही पतसंस्था आणि को.ऑपरेटिव्ह बँका खाजगी सावकाराला लाजवेल असे काम करू लागले आहेत. नागरिकांना सध्या कर्ज फेडणे, एक रकमी कर्ज भरणे शक्य नसताना या बँकांचे मॅनेजर, अधिकारी, कर्मचारी हे कर्जदार, ग्राहकांना अक्षरशा जेरीस आणत आहेत. तुम्ही जगा किंवा मरा पण आमचे पैसे अगोदर भरा असे ब्रीदवाक्य घेऊनच हे लोक आता उतरले आहेत. लोकांची बँक खाती लॉक करून त्यांना अक्षरशा जेरीस आणण्याचे काम या बँकांचे अधिकारी करत आहेत. लोकांची होणारी ही मानसिक पिळवणूक हि कायद्याचा धाक दाखवून केली जात आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन करण्यात आला होता. त्यावेळी पुुणे जिल्हा, दौंड तालुका हा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जास्त प्रभावित झाला होता. याच तालुक्यातील केडगाव हि बाजारपेठ जास्त प्रभावित होऊन सर्व व्यवहार ठप्प झाले होते. जवळपास 6 ते 7 महिने सर्व व्यापार, दुकाने, व्यवसाय बंद होते. 

या लॉकडाउन मध्ये अनेकांचे रोजगार गेले, अनेकजण कर्जबाजारी झाले तर अनेकांनी पतसंस्था, बँकांचे काढलेल्या कर्जाचे हफ्ते भरणे कठीण होऊन बसले हे सर्व होत असताना काही लॉकडाउन काळात आणि त्यानंतरही पतसंस्था, को.ऑप. बँका मात्र खाजगी सावकारापेक्षाही जास्त आक्रमक होऊन ग्राहकांना त्रास देऊ लागल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली. लॉकडाउन शिथिल होताच पतसंस्था,  बँकांच्या कर्जदारांनी थोडे का होईना पण पैसे भरण्यास सुरुवात केली. 

सध्याचे वातावरण पाहता पतसंस्था, बँका, कर्जदारांच्या, ग्राहकांच्या अडचणींना समजून घेतील असे वाटत होते मात्र पतसंस्था आणि बँकांनी पुन्हा कायद्यावर, नियमांवर बोट ठेवत मार्च एन्ड होत नाही तोच कर्जदार, जामिनदारांची खाती लॉक करण्यास सुरुवात केली आहेत, व अनेकांची खाती लॉक करून ठेवली आहेत. सरकार म्हणते कॅशलेस व्यवहार करा पण ज्या लोकांच्या उपजीविकेसाठी या खात्यांमध्ये हजार, दोन हजार रुपये शिल्लक आहेत ते पैसे आता या खात्यांमधून काढताही येत नाहीत अशी अवस्था होऊन बसली आहे. 

त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या लोकांना आता जगावे की मरावे असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. सात-आठ महिने व्यवसाय, दुकाने, रोजगार बंद असताना या छोट्या मोठ्या कर्जदारांनी पैसे आणायचे कोठून आणि कसे भरायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. जामीनदार, कर्जदारांची खाती लॉक करून पतसंस्था, बँका ह्या लोकांचे जिने अवघड करून टाकत असल्याची भावना आता लोक बोलून दाखवू लागले आहेत. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारने या पतसंस्था, बँकांना कोरोना काळात नागरिकांना त्रास देण्यासापासून रोखण्याची मागणी होत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago