Categories: आरोग्य

आयुष्यमान भव मोहिमेचा दौंडमध्ये शुभारंभ | मा. आमदार रंजनाताई कुल यांच्या हस्ते उद्घाटन

अख्तर काझी

दौंड : केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दौंड चे आमदार राहुल कुल यांचे प्रतिनिधी मा. आमदार रंजनाताई कुल यांनी या मोहिमेचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष खिल्लारे,मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, शितल कटारिया तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य राजु गजधने, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.

केंद्र शासन व राज्य शासनाचे आरोग्य विभागाच्या मोहिमेंतर्गत आयुष्यमान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयव दान जागृती, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आयुष्यमान भव मोहिमेंतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन दर आठवड्याला,दि.17 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्ररोग, कान,नाक, घसा तज्ञ, मानसिक आजार, टेली कन्सल्टन्सी ई. तज्ञांमार्फत आरोग्य सेवा देण्यात येतील.

त्याचप्रमाणे रक्तदान व अवयव दानाबाबत प्रेरित करण्यात येणार आहे. मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अवयवदानाकरिता प्रतिज्ञा करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी केले व नेत्र चिकित्सा अधिकारी टी.डी शिंदे यांनी आभार मानले.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago