अख्तर काझी
दौंड : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत या महत्त्वकांक्षी योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथक (सरकारी दवाखाना, दौंड) येथे आयुष चिकित्सा व असंसर्ग जन्य आजार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. बि.आर. साखरे, श्री रमेश लातूरे , श्रीमती पुष्पा गायकवाड ,श्रीमती अंकिता शेलार ,कैलास पारचे यांनी सहभाग घेतला. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, संधीवात, रक्तक्षय, क्षयरोग इत्यादी आजाराशी संबंधित 81 रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. यावेळी आलेल्या रुग्णांना विविध आजारांविषयी समुपदेशन करण्यात आले.
आयुष्यमान भारत कार्यक्रमा अंतर्गत दौंड तालुक्यातील ३५ प्रा. आ. उपकेंद्रे ८ प्रा. आ. केंद्रे, प्रा. आ. पथक १ व नागरी आरोग्य केंद्र १ अशा सर्व ठिकाणी आज दिनांक २३/९/२०२३ रोजी असांसर्गिक आजारांचे शिबीर आयोजन करुन यामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, क्षयरोग तपासणी, कर्करोग तपासणी व असांसर्गिक आजारामधील इतर तपासण्या करण्यात येऊन औषधोपचार करण्यात आले.
तसचे 537 आभाकार्ड, 51आयुष्यमान गोल्डनकार्ड, आरोग्य शिक्षण देणे याबाबत सदर शिबीरामध्ये माहिती देण्यात आली. सदर शिबीरामध्ये २२०४ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी पं.स.दौंड आरोग्य विभाग डॉ. उज्वला जाधव यांनी दिली.