सुधीर गोखले
सांगली : जागतिक अमली पदार्थ विरोधी सर्वत्र जनजागृती मोहीम सुरू असून याचाच एक भाग म्हणून आज सांगली शहर वाहतूक शाखेतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या रॅलीचे आणि रॅलीमध्ये सहभागी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक स्वतः पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी केले रॅलीची सांगता नूतन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर झाली.
सध्या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विविध स्तरावर अनेक उपक्रम राबवले जात आहेत. जनजागृती मोहीम हाती घेतली जात आहे. आज जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलातर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये सांगलीच्या आप्पासाहेब बिरनाळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर व सौराष्ट्रेली यांच्यासह पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव सांगली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेल यांनी नशेखोरी पासून दूर राहण्याचा सल्ला दिला तसेच चांगल्या संगतीमध्ये रहा व चांगले आयुष्य घडवा असाही मोलाचा सल्ला दिला.
रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज आदर चौक मार्गे विश्रामबाग येथील नूतन पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये रॅली ची सांगता झाली. रॅलीचे संयोजन शेखर निकम अल्ताफ हुजरे आणि सहकाऱ्यांनी केले तर साहेब करणारे स्कूलचे संचालक सागर बिरनाळे यांनी सहकार्य केले.