डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने प्रभात फेरी

केडगाव (दौंड) : आज दिनांक 08/07/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र केडगाव आणि जवाहरलाल विद्यालय केडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जवाहरलाल विद्यालय या ठिकाणी डेंगू प्रतिरोधक महिना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी तसेच आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी सर्व शिक्षक वृंद यांच्यामार्फत जवाहरलाल विद्यालय केडगाव ते बाजार मैदान केडगाव येथे प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी डेंग्यू आजारामुळे तीव्र ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, त्वचेवर पुरळ आणि गंभीर स्थितीत अंतर्गत रक्तस्त्राव, रक्तदाब कमी होतो आणि अवयवांचे नुकसान होऊ शकते.

वेळीच उपचार न झाल्यास, डेंग्यूमुळे यकृत, मेंदू आणि किडनीसारख्या अवयवांचे नुकसान होते. त्यामुळे डेंग्यूची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार न केल्यास, डेंग्यू गंभीर रूप धारण करून जीवघेणा ठरू शकतो अशी माहिती यावेळी डॉक्टरांकडून देण्यात आली.

सदर कार्यक्रमासाठी डॉ. नीलिमा लोखंडे (वैद्यकीय अधिकारी केडगाव)  टुले सर (प्राचार्य) मारणे आरोग्य (पर्यवेक्षक दौंड) गोपीनाथ हंडाळ (आरोग्य निरीक्षक केडगाव) तसेच आरोग्यसेवक मासाळ, मुलाणी, मकानदार, पोळ, मराळे, सदाफुले, टिबे आणि सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर उपस्थित होते.