ऑटो रिक्षांचे भाडे वाढले, ‛या’ तारखेपासून आता इतके पैसे मोजावे लागणार

पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे कार्यक्षेत्रातील (पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती) ऑटोरिक्षा भाडेसुधारणा 22 नोव्हेंबरपासून लागू करण्याचा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी घेतला निर्णय

या भाडेवाढीमुळे रिक्षाचालकांना फायदा होणार असून प्रवाश्यांना मात्र आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. याबाबत आज माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून खालील प्रमाणे भाडेवाढ होणार आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे कार्यक्षेत्रातील (पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती) यांची संयुक्त बैठक 11 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली होती. या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला होता. तो येत्या 22 नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणार आहे.