केडगाव (दौंड) : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती केडगाव (Kegaon sub-market) येथे १ जुलै पासून पेरू आणि डाळिंबाचे लिलाव सुरू होणार आहेत. आमदार राहुल कुल यांनी मार्केट कमिटीमध्ये पेरू आणि डाळिंबाचे लिलाव सुरु करण्याबाबत सुचना केल्या होत्या त्यानुसार दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजार येथे १ जुलै पासून पेरू आणि डाळिंबाचे लिलाव सुरू केले जात आहेत असे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहीर करण्यात आले आहे.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारात पेरू आणि डाळिंबाचे लिलाव सुरू होत आहेत. त्यामुळे डाळिंब आणि पेरू खरेदीसाठी व्यापारी वर्गही आनंदाने तयार झाला आहे. शेतकऱ्यांनी या लिलावात सहभागी होऊन आपल्या फळांना चांगला भाव मिळवावा असे आवाहन सुद्धा व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी विशेष सोय : पेरू आणि डाळिंबाचे लिलाव व्यवस्थित पार पडावेत यासाठी बाजार समितीने योग्यपद्धतीने तयारी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने डाळिंब आणि पेरू मार्केटसाटी स्वतंत्र शेडचे बांधकाम केले आहे त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गास याद्वोर चांगली सुविधा मिळणार आहे.
फळांचे लिलाव यशस्वी झाल्याचा अनुभव :
यापूर्वी राहाता बाजार समितीमध्ये पेरू आणि चिकूचे लिलाव यशस्वी झाले आहेत तसेच पिंपळगाव, लासलगाव, यांसारख्या बाजार समित्यांमध्येही डाळिंबाचे लिलाव यशस्वीपणे पार पडले आहेत त्यामुळे या उपबाजारातही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.