कुरकुंभ (दौंड) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथून एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून (Attempted sexual assault on a five-year-old girl) त्या मुलीला मळद येथील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करू पाहणाऱ्या नराधमाला स्थानिक नागरिकांनी वेळीच पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यामध्ये भाग भारतीय न्याय संहिता कलम 65(2), 137(2), 115(2) पो.स्को कलम 4,6,8,10,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ चंद्रकांत रिठे (वय 27 वर्षे, धंदा ड्रायव्हर, मुळ रा. शेरेचीवाडी, ता. फलटण जि. सातारा) याने दिनांक 16.05.2025 रोजी दुपारी 4:40 च्या दरम्यान फिर्यादी यांच्या 5 वर्षीय मुलीचे योगेश भागवत यांच्या पुणे सोलापूर हायवेवरील भागवत वस्ती येथील किराणा दुकानासमोरून अपहरण केले. त्यानंतर तिला मळद (ता.दौंड जि.पुणे) या गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अनन्या हॉटेलच्या आलीकडे उसाच्या शेतात नेउन बळजबरीने तिच्या अंगावरचे कपडे काढून तिला मारहाण करत तसेच तिच्या अवघड जागी बळजबरीने हाताची बोट घालून, त्यांनतर बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी स्थानिक नागरिकांनी मुलीचा आरडा ओरड करत असलेला आवाज ऐकून त्वरित घटनास्थळी जाऊन पुढील भयानक प्रकार रोखला. यावेळी नराधम आरोपी नवनाथ चंद्रकांत रिठे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेचा पुढील तपास महिला पो.स.ई मीरा मटाले (नेम-उरुळी कांचन पोलीस स्टेशन) ह्या करीत आहेत.