Categories: क्राईम

बारामती’मध्ये एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न, फिल्मीस्टाईल घटना

बारामती

बारामतीमध्ये एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तीन अज्ञात इसमांनी त्या व्यक्तीचे फिल्मीस्टाईलने अगोदर अपहरण केले आणि नंतर त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना दि.8 एप्रिल रोजी रात्री 8:00 वाजता बारामती ॲग्रो कंपनीच्या कन्हेरी फार्मजवळ घडली आहे.

याबाबत वसंत लक्ष्मण साळुंके यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या चारचाकी गाडी ने बारामतीकडे येत असताना रात्री ८:३० च्या सुमारास बारामती ॲग्रो कंपनीच्या कन्हेरी फार्म जवळ त्यांच्या गाडीच्या पाठीमागुन एक मोटारसायकलवर तीन इसम त्यांचा पाठलाग करत आले. त्यांनी अगोदर गाडीच्या पाठीमागील काचेवर दगड मारत काच फोडली. नंतर आरोपिंनी त्यांच्या गाडीला मोटारसायकल आडवी मारुन गाडीचा
दरवाजा उघडत फिर्यादीला बाहेर ओढुन लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. आरोपी पैकी एक जणाने त्यांच्या डोकीत काठी मारली त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम होवुन त्यातुन रक्त येवुन लागले. यावर न थांबता त्या तिघांनी फिर्यादीला धरुन गाडीच्या पाठीमागील सीटवर बसवले व गाडी रोडपासुन २०० फुट आतमध्ये शेतात घेतली. तेथे गेल्यावर त्यातील एकाने फिर्यादीस आता आम्ही तुला मारुन टाकतो, असे म्हणुन त्यांच्या उजव्या पायाच्या नडगीवर काठी मारून जबर दुखापत करत पाय फ्रॅक्चर केला आणि अमानुष मारहाण केली.

फिर्यादीचा पाय नडगीत मोडलेला बघीतलेवर आरोपिंनी फिर्यादीला उचलुन गाडीच्या
पाठीमागील सीटवर बसवुन गाडी चालु
करत पुन्हा बारामती रोडला आणुन सोडले. व जाताना शिवीगाळ, दमदाटी करुन डोक्यात दगड घालुन मारुन टाकीन अशी धमकी देवुन निघुन गेले. हा सर्व घटनाक्रम एखाद्या चित्रपटातील घटनेसारखा असून हे तीनजन कोण होते आणि त्यांनी फिर्यादीला इतकी अमानुष मारहाण का केली हे अजून अनुत्तरितच आहे. याबाबत बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि घुगे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago