दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे पैसे चोरल्याच्या संशयावरून एकाच्या गळ्यावर ब्लेड ने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना दि. 14/03/2025 रोजी दुपारी 02:15 च्या सुमरास कुरकुंभ (ता. दौंड जि पुणे) या गावच्या हद्दीत शेवाळे प्लाॅट येथे घडली आहे. याबाबत रिजवान मौलादीन मुलाणी (व्यवसाय लेबर काॅन्टेक्टर रा. कुरकूंभ,दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल भागवत यांचे रूमवर कामगार विमलेश भगीरथी व बंटी कारू मांझी असे दोघे असताना विमलेश भगीरथी याने बंटी कारू मांझी (रा.बिहार) याचे पैसे चोरल्याच्या संशयावरून विमलेश भगीरथी यास शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्कयांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारधार ब्लेडने गळयावर वार करून गंभीर दुखापत केली.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा केल्यावर फरार झाला होता त्याचा शोध घेणे करीत पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी ३ तपास पथक तयार करून रवाना केली असता तो परप्रांतीय असल्याने तो मूळ गावी बिहार राज्य येथे दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन वरून पळून जात असताना अवघ्या ५ तासामध्ये दौंड पोलीस स्टेशन मधील पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. त्यास माननीय न्यानालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील अधिक तपास चालू आहे.