Categories: देश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला! 70 जण ताब्यात

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये, काही समाजकंटकांनी सीएम केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा बॅरिकेट तोडले असल्याचे म्हणत गेटवरील बूम बॅरिअर्सही तोडले आहेत. भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली, असा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे. एवढेच नाही तर भाजपच्या लोकांना पोलिसांनी थांबवण्याऐवजी दारात आणले, असेही ते म्हणाले.
भाजपला केजरीवालांना संपवायचे आहे : सिसोदिया
मनीष सिसोदिया म्हणाले, भाजपला अरविंद केजरीवाल यांना संपवायचे आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर एका सुनियोजित पद्धतीने षडयंत्र रचून हा हल्ला करण्यात आला असून त्यांना निवडणुकीत पराभूत करता येत नाही, त्यामुळे त्यांना आता असेच संपवायचा या लोकांचा डाव आहे असे ते म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 150-200 कार्यकर्त्यांनी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले. द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत विधानसभेत केजरीवाल यांच्या विधानाविरोधात हे निदर्शने करण्यात येत होती. 1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक बॅरिकेड तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. त्यांनी दरवाजावर रंगरंगोटी केली आणि येथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून 70 जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

16 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago