Categories: क्राईम

‘खुटबाव’ येथे ‘जातीवाचक’ शिवीगाळ, चाकूने वार करत ‘जीवे’ मारण्याचा प्रयत्न! आरोपीवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ सह गंभीर गुन्हे दाखल

दौंड / यवत : दौंड तालुक्यातील खुटबाव येथे भावाला मारहाण का केली असा जाब विचारणाऱ्याला चाकू आणि कुदळीने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 24/04/2022 रोजी रात्री 08ः30 वाचे सुमारास फिर्यादी आकाष सोपान फासगे (खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे) याने आरोपी रोहन नाना जाधव, (रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे) यास माझा भाऊ भानुदास सोपान फासगे याला मारहाण का केली अशी विचारणा केली असता आरोपीने फिर्यादी व त्याचा भाऊ भानुदास फासगे असे दोघांना तू खालच्या जातीचा आहे तु हिशोबात रहा नाहितर तुझा आज कार्यक्रमच करतो, अशी जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करून आरोपीने त्याचे खिशातील चाकु काढुन फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण करून आपखुषीने दुखापत केली. त्यावेळी त्याचा भाऊ भानुदास सोपान फासगे हा सोडवण्यासाठी आला असता त्यालाही कुदळ ने ‘‘जिवे ठार मारण्याचे उददेषाने’’ डाव्या बरगडीवर मारून गंभीर दुखापत करण्यात आली आहे.

या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने रोहन नाना जाधव याचे विरूध्द कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धस हे करीत आहे. तर सदर गुन्हा पोसई/नागरगोजे यांनी दाखल करून घेतला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago