Categories: Previos News

आजपासून गॅस सिलेंडर, ATM, PF आणि किसान सन्मान निधीसह या 10 गोष्टींच्या नियमांत होणार मोठे बदल, जाणून घ्या



नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आपल्या देशामध्ये आज 1 जुलै पासून महत्वाच्या या 10 गोष्टींमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत.  या नवीन नियमांचा फायदा होणार असला तरी याकडे दुर्लक्ष केल्यास याचा आर्थिक फटकाही बसण्याची शक्यता आहे. या नवीन नियमांमध्ये LPG गॅस सिलेंडर, किसान सन्मान निधी नोंदणी,MSME ची ऑनलाईन नोंदणी, अटल पेन्शन योजना, पी एफ मधून पैसे काढणे, बचत खात्यांवरील पीएनबी व्याज दर, ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्क या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. याबाबत आजपासून नेमक्या कोणत्या बाबी बदलणार आहेत जाणून घेऊया

● ATM विड्रॉलसाठी शुल्क आकारणी

लॉकडाऊन काळामध्ये केंद्र सरकारने ATM मधून पैसे काढताना आकारला जाणाऱ्या शुल्कावर सूट दिली होती. त्यासाठी तीन महिन्यात कोणत्याही बँकेच्या ATM मधून विनाशुल्क रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली होती. यासाठी 30 जून  2020 ही शेवटची तारीख होती. त्यामुळे आज 1 जुलैपासून ठराविक ट्रांजेक्शन नंतर ATM मधून पैसे काढण्यासाठी ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे.

● किसान सन्मान निधी मध्ये नोंदणी

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 2000 रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत 5 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. या योजनेची नोंदणी 30 जूनपर्यंत होती. जर 30 जूनपर्यंत नोंदणी केली असले आणि ज्याच अर्ज स्विकारण्यात आला असेल त्याला जुलै मध्ये 2000 रुपये आणि ऑगस्टमध्ये दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात 2000 रुपये मिळू शकतील.

● कोरोना काळात PF चे पैसे काढण्याची शेवटची तारीख.

केंद्र सरकारने पीएफमधून पैसे काढण्यासाठी अनेक नियम शिथिल केले आहेत. लोकांकडे रोखीची कमतरता लक्षात घेता वित्त मंत्रालयाने ईपीएफकडून आपत्कालीन पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करू दिली होती. त्यासाठी 30 जून रोजी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी खात्यातून भागधारक मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 3 पट पेक्षा कमी किंवा एकूण ठेव रक्कमेच्या 75 टक्के रक्कम काढू शकणार आहेत.

● MSME ऑनलाइन नोंदणी मायक्रो, लघु आणि मध्यम उपक्रम (एमएसएमई) आज आपण 1जुलैपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

या संदर्भात सरकारने माहिती देताना ही नोंदणी स्वयंघोषित माहितीच्या आधारे असेल, त्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नाही असे स्पष्ट केले आहे. उद्योजकांना केवळ आधार क्रमांकाद्वारे नोंदणीची सुविधा दिली जाईल आणि सर्व माहिती स्वयंघोषीत असेल. यासाठी कागदपत्रांची गरज पडणार नाही. मंत्रालयाने ठरविल्या नुसार नोंदणी MSME च्या नव्या परिभाषेवर आधारित असेल.

● खात्यात किमान शिल्लक आवश्यक.

आजपासून तुमच्या खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक रक्कम नसल्यास बँकेकडून दंड आकारला जाऊ शकतो.लॉकडाउन काळामध्ये म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान यामध्ये सूट देण्यात आली होती. सूट वाढवण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

● बचत खात्यांवरील पीएनबी व्याज दर

पंजाब नॅशनल बँक आजपासून आपल्या बचत खातेधारकांना कमी व्याज देणार असून बचत खात्याच्या व्यजदरामध्ये 0.50 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. आजपासून हा नियम लागू होणार आहे. यानंतर बँकेच्या बचत खात्यावर जास्तीत जास्त 3.25 टक्के वार्षीक व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यात 50 लाख रुपयापर्यंत जमा रकमेवर 3 टक्के वार्षीक आणि 50 लाखापेक्षा अधिक रकमेवर 3.25 टक्के वार्षीक व्याज देण्यात येणार आहे.

● LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल.

आजपासून देशात एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलणार आहेत. याबाबत आपल्या देशातील तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल करण्यात येत असतो.

● विश्वास योजनेचा लाभ मिळणार नाही.

सेवा कर आणि मध्यवर्ती उत्पादन शुल्क या संदर्भात जुन्या प्रलंबित वादग्रस्त खटल्यांच्या निराकरणासाठी सादर केलेली विश्वास योजनेच्या देयकाची अंतिम तारीख 30 जून आहे. त्यामुळे आपण या योजनेचा लाभ आजपासून घेऊ शकणार नाही. सबका विश्वास योजना कर विवादाच्या प्रत्येक समस्येवर तोडगा आहे. 30 जून नंतर या योजनेची मुदत वाढवण्यात येणार नाही हे सरकारने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डाच्या वतीने ट्विट करून माहिती देण्यात आली आहे.

● अटल पेन्शन योजनेत मोठा बदल.

आजपासून अटल निवृत्तीवेतन योजना खात्यांमधून मासिक योगदानाचे ऑटो डेबिट होण्यास सुरुवात होईल. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकारणाने बँकांना अटल पेन्शन योजनेचे ऑटो डेबिट 30 जूनपर्यंत थांबवण्याचे निर्देश दिले होते. त्या आधारे आजपासून पुन्हा एकदा ऑटो डेबिट सुविधा सुरू केली जाईल.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

7 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

9 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

11 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago