|सहकारनामा|
दौंड : यवत पोलिस स्टेशन हद्दीत दि. १४/८/२०२१ ते दि २३/८/२०२१ या कालावधीत कासुर्डी येथील IDBI बँकेचे ATM फोडून सुमारे 11 लाख 58 हजार 300 रुपये चोरी करून नेल्याची घटना घडली होती. यावेळी आय डी बी आय बँक शाखा – कासुर्डी (ता.दौड) येथील शाखा मॅनेजर आशिषकुमार पंचानंद शर्मा यांनी यवत पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली होती.
सदरच्या गुन्ह्यात atm मशीनचा दरवाजावर असलेला पासवर्ड टाकून मशीनचा दरवाजा तोडून त्यातील सुमारे ११ लाख ५८ हजार ३०० रु चोरीस गेले होते.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक सदर गुन्ह्याचा तपास करीत होते.
सदर गुन्हा घडले पासून कोणताही पुरावा हाती लागत नव्हता कोणतेही cc tv फुटेज अथवा कोणताही मार्ग आरोपी पर्यंत पोहचेल अशी परिस्थिती नसताना पोलिसांनी योग्य दिशेने कसून तपास करत सदरच्या पथकाने आय डी बी आय बँकेतील ऑफिस बॉय नामे १) साजन बाळासाहेब भोसेकर, (वय – २६ वर्षे रा. ताम्हणवाडी, ता.दौड, जि.पुणे) यास ताब्यात घेतले त्याचेकडे कसून चौकशी केली असता, असे समोर आले की, सदर atm मशिन चा पासवर्ड माहिती असल्याचे समोर आले. सदरचा पासवर्ड त्याने त्याचे मित्र नामे २) अजय मारुती चव्हाण (वय 24 वर्षे रा तळवाडी शिंदवणे रोड उरुळी कांचन ता हवेली जि पुणे) आणि ३) केतन बाळासाहेब ढवळे (रा खेडेकर मळा उरुळी कांचन) यांना सांगितला आणि atm मधील रोख रक्कम लुटण्याचा कट रचला आणि atm मशीन चा वीज सप्लाय बंद करून तांत्रिक बिघाड असल्याचा बनाव करून दि १६/८/२०२१ रोजी आरोपी क्र २ आणि ३ यांनी मध्यरात्री येऊन atm मशीन चा पासवर्ड टाकून मशीन मधील सुमारे ११ लाख ५८ हजार ३०० रु रोख रक्कम लुटून atm मशीनची तोडफोड करून निघून गेले.
आरोपी क्र १ आणि क्र २ यांना ताब्यात घेतले असून सदरील गुन्हा केल्याचे सांगत आहेत तसेच आरोपी नामे मारुती चव्हाण याचे कडून रोख रक्कम ७लाख २३हजार ९०० रु जप्त केले आहे सदरील गुन्ह्यातील आरोपी
१) साजन बाळासाहेब भोसेकर (वय २६ वर्षे रा ताम्हणवाडी, ता.दौड, जि.पुणे)
२) अजय मारुती चव्हाण (वय 24 वर्षे रा तळवाडी शिंदवणे रोड उरुळी कांचन ता. हवेली जि.पुणे) या दोन आरोपीना ताब्यात घेतले असून आरोपी केतन बाळासाहेब ढवळे (रा.खेडेकर मळा उरुळी कांचन) याचा शोध सुरू आहे. सदरील दोन्ही आरोपी मुद्देमालासह पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहेत.
सदरील कारवाई ही पोलिस अधिक्षक सो अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते तसेच उपविभागीय अधिकारी दौड विभाग अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री अशोक शेळके, पो स ई अमोल गोरे पो हवा विजय कांचन, पो हवा राजू मोमीन, जनार्दन शेळके अजय घुले, अजय भुजबळ पो ना मंगेश थिगले, चंद्रकांत जाधव, मंगेश कदम, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, पो ना सुजाता कदम, पो कॉ पूनम गुंड, पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.