Categories: पुणे

दौंड च्या अपघातग्रस्त कुटुंबियांना ४० लाखांची मदत मंजूर

दौंड : दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे आर्थिक मदत मिळावी यासाठी आ. कुल यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्याद्वारे दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या २० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या मदतीच्या धनादेशांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये मौजे रावणगाव, ता. दौंड येथे ट्रॅक्टर ट्रॉली कालव्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या ३ मजूर भगिनींच्या कुटुंबीयांचा देखील समावेश आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे खालील मयत शेतकऱ्यांचा कुटुंबियांना मदत मिळाली –

स्व. रेश्मा भागुजी पानसरे (रा. रावणगाव), स्व. सुरेखा बाबासो पानसरे (रा. रावणगाव), स्व.अश्विनी प्रमोद आटोळे (रा. रावणगाव), स्व. मारुती गुलाब दिवेकर (रा. पारगाव), स्व. विलास अर्जुन माने (रा. हिंगणीबेर्डी) स्व. चंद्रकांत बबन रांधवन (रा. रावणगाव) ,स्व दिनकर गांडले (रा. पारगाव) स्व. सचिन भीमराव ताम्हाणे (रा. ताम्हणवाडी), स्व. संकेत सदाशिव म्हेत्रे (रा. बोरीऐंदी) स्व. विष्णु मुरलीधर पाचपुते (रा. बोरीबेल),स्व. स्वप्निल बाळासाहेब दरेकर (रा. बोरीऐंदी), स्व. शंकर काशिनाथ काळे (रा. मलठण), स्व. मनोहर विठ्ठल दिवेकर (रा.पाटस) ,स्व.संजय नरहरी शिंदे (रा.हातवळण), स्व. प्रफुल्ल अर्जुन शितोळे (रा. कुसेगाव), स्व. अरविंद मुगुटराव भगत (रा. वासुंदे) ,स्व. पोपट भागुजी मरगळे (रा. मेरगळवाडी), स्व. सुदाम मुगुटराव शेळके (रा. केडगाव), स्व. संपत कोंडीबा चौधरी (रा. खोर )

यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल माने , भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अरुण आटोळे ,भाजपा नेते  तानाजी दिवेकर, भीमा पाटसचे संचालक  विकास शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago